S M L

बिल्डरांवर सरकार उदार, एसआरए प्रकल्पांना आर्थिक मदत

मुंबईतल्या एसआरए प्रकल्प करणाऱ्या बिल्डरांना सरकार थेट आर्थिक मदत करणार आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या सरकारी कंपनीमार्फत ही आर्थिक मदत केली जाणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 15, 2017 11:41 AM IST

बिल्डरांवर सरकार उदार, एसआरए प्रकल्पांना आर्थिक मदत

15 आॅक्टोबर : एरवी तिजोरीत खडखडात आहे असं सागणारं राज्य सरकार बिल्डरांवर चांगलंच उदार झालेलं दिसतंय. कारण मुंबईतल्या एसआरए प्रकल्प करणाऱ्या बिल्डरांना सरकार थेट आर्थिक मदत करणार आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या सरकारी कंपनीमार्फत ही आर्थिक मदत केली जाणार आहे.

एवढंच नाही, तर एसबीआयकडून ८.७ टक्के व्याजदरानं कर्ज पुरवण्यासाठीही करार झाला आहे. मुंबईमध्ये जवळपास 3500 SRA प्रकल्प रखडले आहेत, तसेच शेकडो नव्या प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत, या प्रकल्पाच्या पुर्ततेतून प्रधानमंत्री आवास योजनेला राज्यात बळ मिळेल अशी सरकारची धारणा आहे. मात्र विरोधी पक्षांना हा टक्केवारीचा खेळ वाटतो आहे.

नेमकी ही योजना काय आहे ?


  • - एसआरए योजनेसाठी बिल्डरांना सरकार पतपुरवठा करणार
  • - शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या कंपनीमार्फत अर्थसहाय्य
  • Loading...

  • - बिल्डरांसाठी सरकारचा एसबीआयबरोबर करार
  • - 8.7 टक्के दरानं बिल्डरांना कर्ज मिळवून देणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 11:41 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close