मुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा

मुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा

मुंबईकरांनो, शॉपिंगचा आनंद लुटा मनसोक्त ! राज्य सरकारने पहिल्या मुंबई खरेदी महोत्सवाची घोषणा केली असून, १२ ते ३१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १३ ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : मुंबईकरांनो, शॉपिंगचा आनंद लुटा मनसोक्त ! राज्य सरकारने पहिल्या मुंबई खरेदी महोत्सवाची घोषणा केली असून, १२ ते ३१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १३ ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे. यात आठवड्याच्या शेवटी रात्रीच्या बाजारात मनसोक्त खरेदी करता येणार आहे. पर्यटन मंत्रालय, एमटीडीसी व राज्य सरकारच्या वतीने हा महोत्सव होईल.

तीन आठवड्यांच्या महोत्सव कालावधीत फूड ट्रक असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याच्या शेवटी प्रसिद्ध सार्वजनिक ठिकाणी खाद्यट्रक उभे करण्यात येणार आहेत. यादरम्यान दुकाने आणि आस्थापना २४ x ७ उघडे ठेवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबई हे जागतिक दर्जाचे खरेदी केंद्र म्हणून उदयाला येईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

कुठे कुठे होणार हा महोत्सव?

गिरगाव चौपाटी

क्रॉफर्ड मार्केट

वरळी सीफेस

शिवाजी पार्क, दादर

कार्टर रोड, वांद्रे

जुहू चौपाटी

आंतरराष्ट्रीय विमानतळ

आंतरदेशीय विमानतळ

वाशी रेल्वे स्थानक

ठाणे

मुलुंड

गॅलरिया मॉल, पवई

मॅक्सस मॉल, मीरा रोड

First published: January 6, 2018, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading