मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, बिल सभागृहात मांडणार

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, बिल सभागृहात मांडणार

मराठा आरक्षण बिल जरी सभागृहात मांडण्यात येणार असलं तरी याबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला जाणार नाही.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंके, प्रतिनिधी, मुंबई, 26 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाचं बिल सभागृहात मांडण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे बिल सभागृहात मांडण्यात येणार आहे.

या मराठा आरक्षण बिलावर एकमताने निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण बिल जरी सभागृहात मांडण्यात येणार असलं तरी याबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला जाणार नाही.

जोपर्यंत मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल सभागृहात मांडला जात नाही, तोपर्यंत कामकाज सुरू होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

'आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आहोत. तसंच धनगर आरक्षणाचा अहवाल घेऊन आम्ही केंद्रात आदिवासी आयोगासमोर जाणार आहोत. त्यामुळे कोणीही आंदोलन करू नये,' अशी विनंती महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी केली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मंत्रिमंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी कशा पद्धतीने कायदा करावा, याबाबत ही समिती काम करत आहे. या समितीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: November 26, 2018, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading