• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 31 जुलैच्या आतच मुंबई विद्यापीठाचे निकाल लावा- राज्यपाल

31 जुलैच्या आतच मुंबई विद्यापीठाचे निकाल लावा- राज्यपाल

मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नकार दिलाय. काहीही करा पण 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करा, कारणं देऊ नका कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, याबाबत खबरदारी विद्यापीठाने घ्यायची आहे की एकाही विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश आणि शिक्षण याबाबत नुकसान होणार नाही असंही राज्यपाल म्हणालेत

  • Share this:
मुंबई, 24 जुलै : मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नकार दिलाय. काहीही करा पण 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करा, कारणं देऊ नका कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, याबाबत खबरदारी विद्यापीठाने घ्यायची आहे की एकाही विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश आणि शिक्षण याबाबत नुकसान होणार नाही असंही राज्यपाल म्हणालेत, राज्यपालांनी आज शिक्षण विभागाच्या सचिवांसह विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. राज्यपालांच्या या तंबीमुळे मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजमधील प्राध्यापकांना पुढचे 4 दिवस मुलांना शिकवायचं सोडून फक्त पेपर तपासण्याचे निर्देश दिलेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. या साऱ्या शैक्षणिक गोंधळाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षण मंत्रीच जबाबदार आहेत त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केलीय. आज सकाळीच त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन यासंबधीचं निवेदन दिलंय. या आरोपाबाबत मात्र, विनोद तावडेंनी आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडत असल्याचा पलटवार केलाय. शिवसेनेचे मंत्री रविंद्र वायकर हे देखील उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री आहेत, मग, आदित्य ठाकरे त्यांचाही राजीनामा घेणार का असा प्रतिसवाल तावडेंनी केलाय.
First published: