आता यालाही प्रत्युत्तर देणार का? नितेश राणेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

आता यालाही प्रत्युत्तर देणार का? नितेश राणेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हिंदु राष्ट्राबद्दल काय म्हणाले होते, याची आठवणच करून दिली आहे.

  • Share this:

 

मुंबई, 14 ऑक्टोबर : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. आता या वादात भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हिंदु राष्ट्राबद्दल काय म्हणाले होते, याची आठवणच करून दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थितीत केला होता. त्यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर देत खरमरीत पत्र लिहिले होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.

मोठी बातमी ! 2 लढाऊ चॉपरची आकाशात धडक, वैमानिकासह 15 लोकांचा मृत्यू

भाजप आमदार नितेश राणे यांनी या वादावर एक ट्वीट केले आहे. संजय राऊतांनी काही वर्षांपूर्वी सामनाच्या रोखठोक सदरातील संदर्भ देत आता यालाही तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचंय का, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.

राऊत यांनी या लेखात ‘धर्मनिरपेक्षता मरण पावली असून भारताला आता हिंदु राष्ट्र घोषित करावं, अशी मागणी केली होती’ असं या ट्विटमध्ये नितेश यांनी म्हटलं आहे.

तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.  'राज्यपाल यांच्याकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे.  तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना ही स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई लढतो, असल्याचं सांगतो पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे उद्धव आपल्या पत्रात?

'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

फडणवीसांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, महाजनांकडे मागितले 1कोटी

'Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Published by: sachin Salve
First published: October 14, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या