मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोरावर मोर, राजभवनात रंगली भांडणं, राज्यपालांनीच शेअर केला हा भन्नाट Video

मोरावर मोर, राजभवनात रंगली भांडणं, राज्यपालांनीच शेअर केला हा भन्नाट Video

राजभवनात असलेल्या अनेक मोरांपैकी दोन मोर आमनेससामने आले आणि त्यांच्यात झुंज रंगली. ही घटना तिथल्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा मनोहारी व्हिडिओ प्रसारित केला.

मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्राच्या राज्यपालांचं (Governor of Maharashtra) मुंबईतील कार्यालय आणि निवासस्थान म्हणजे राजभवन (Raj Bhavan). या राजभवनात असलेल्या अनेक मोरांपैकी (Peacocks) दोन मोर आमनेससामने आले आणि त्यांच्यात झुंज रंगली. ही घटना तिथल्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा मनोहारी व्हिडिओ प्रसारित केला.

राजभवनाचा परिसर मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू आणि निसर्गरम्य मानला जातो. राजभवनाच्या परिसरात ज्या प्रकारे निसर्गाचं संवर्धन करण्यात आलं आहे, ते पाहून अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. या भागात अनेक मोरांचा अधिवास आहे आणि तो उत्तमरित्या जपण्यात आला आहे. यातील काही मोर हे वर्चस्वासाठी आपसात झगडत असल्याचं चित्र अनेकदा दिसतं.

प्राण्यांमध्ये नेहमीच वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. आपला अधिवास असलेल्या परिसरात इतर प्राण्याने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, तर ही वर्चस्वाची लढाई सुरू होते आणि दोन्ही प्राणी प्राणपणाने एकमेकांशी भांडत असल्याचं चित्र दिसतं. हिंस्त्र प्राण्यांमध्ये जसा हा प्रकार आढळून येतो, तसाच तो पक्ष्यांमध्येही आढळून येतो. राजभवनाच्या परिसरात वेगवेगळ्या भागात गुण्यागोविंदानं राहणारे मोर हे एकमेकांच्या परिसरात आले की असा संघर्ष उफाळून येत असतो.

हे वाचा- परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, विधानसभा उपाध्यक्षांनीही दिले नाशिक पोलिसांना आदेश

व्हिडिओ व्हायरल

सुरुवातीला या मोरांचा सुरु असणारा संघर्ष, नंतर युद्धापूर्वीची शांतता आणि शेवटी एकमेकांवर पूर्ण क्षमतेने केलेले हल्ले हे चित्र राजभवनाच्या परिसरात दिसलं. या व्हिडिओला सध्या नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत असून ते एकमेकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Governor bhagat singh, Viral video.