मुंबई, 16 जून : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या निर्णयामुळे कायम चर्चेत असतात. अलीकडेच राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पत्रलेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राज्यपालांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय डाक विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली होती.
डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने “ढाई आखर” अशी ही राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. pic.twitter.com/TrFOAri08D
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 15, 2020
आंतरदेशीय या प्रवर्गातील स्पर्धेत राज्यपालांना 25 हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले आहे. मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक पी सी जगताप यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना बक्षिसाचा 25 हजाराचा धनादेश सुपूर्द केला.
हेही वाचा - लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, नवा आदेश जारी
“प्रिय बापू आप अमर है” या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा आणि “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत 80,000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संपादन - सचिन साळवे