Home /News /mumbai /

राज्यपाल इज बॅक, कोरोनावर मात करून कोश्यारी आजपासून राजभवनावर, राजकीय घडामोडींना येणार वेग

राज्यपाल इज बॅक, कोरोनावर मात करून कोश्यारी आजपासून राजभवनावर, राजकीय घडामोडींना येणार वेग

  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल हे राजभवनावर जाणार आहे

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल हे राजभवनावर जाणार आहे

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल हे राजभवनावर जाणार आहे

    मुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde)  यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) हे रुग्णालयात होते. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा राजभवनावर दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. सुरत व्हाया गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे मुक्कामी आहे. शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. उपचाराअंती आता राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. (मलायकाने BF अर्जुनाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी निवडलं 'हे' ठिकाण;रोमँटिक PHOTO...) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल हे राजभवनावर जाणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यपाल राजभवनावर नसल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावला होता. आता राज्यपाल राजभवनावर पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे गट सक्रिय होईल आणि लवकरच राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल आता का भूमिका घेतात हे पाहण्याचे ठरणार आहे. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटही सावध झाला आआहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्लानंतर आता अशा आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुवाहाटीचा मुक्काम वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन होईपर्यंत केंद्रीय सुरक्षा पुरवण्याची रणनीती आखली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या