राज्यपालांनी राजभवनासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय, केल्या 'या' सूचना!

राज्यपालांनी राजभवनासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय, केल्या 'या' सूचना!

आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले 30 टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले.

  • Share this:

मुंबई, 28 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश दिले आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज 28 मेपासून राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.

यापुढे राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.  पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहूण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तु वा स्मृतीचिन्ह देऊ नये आणि पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करू नये, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे.

हेही वाचा - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी गुजरातमध्ये तयार झालाय हा 'धन्वंतरी रथ'

तसंच, स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला  15 ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा, असा निर्णयही राज्यपालांनी केला. त्याचबरोबर  राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये आणि  कुलगुरू आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन करून प्रवास खर्चात बचत करण्यात यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी केली.

या उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 ते 15 टक्के बचत होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले 30 टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

आज जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही कोरोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपूर्ण ठरेल, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First Published: May 28, 2020 01:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading