Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाला नवे वळण, राज्यपाल करणार 'दिल्ली'शी चर्चा?

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाला नवे वळण, राज्यपाल करणार 'दिल्ली'शी चर्चा?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

    मुंबई, 22 एप्रिल : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या निर्णयावर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राज्याच्या कॅबिनेटने उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणी भगतसिंग कोश्यारी यांनी  अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला विचारण्याची भूमिका घेतली होती. पण, आता राज्यपालांची दिल्लीत चर्चा झाल्यावरच या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.  यासाठी ते राष्ट्रपतींशीही चर्चा करण्याचा निर्णय घेऊ शकतात. विशेष म्हणजे, हा मुद्दा सामजस्यांने सोडावा असं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटत आहे. यासाठीच शिवसेना नेते अरविंद सावंत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली. राज्यपालांसोबत सेना नेत्यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेतून मार्ग निघावा यासाठी सेनेचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, पण पुढे कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून आताच सामोपचाराने पडद्याआड चर्चा सुरू आहे. हेही वाचा - वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडे सोपवणार, अनिल देशमुख यांनी केलं जाहीर पण,  एकीकडे चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करून आणखी वाद वाढवला. गेल्या 16 दिवसांपासून राज्यपालांनी या प्रकरणी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.त्यांच्या या ट्वीटमुळे राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर सेनेच्या नेत्यांनीही याबद्दल नाराज दर्शवली आहे. हेही वाचा - Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य देण्यावरून चर्चा झाल्याचं कळतंय. परंतु, पालघर प्रकरण आणि मुंबईत कोरोनाच्या चाचणीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काय आहे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेचप्रसंग? उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर 6 महिने राहता येतं. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. हेही वाचा -'जर हे खरं असेल तर...', किम यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांवरील निवडणुका तहकूब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाकडून करण्यात आली होती. पण, त्यावर अद्याप राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. जर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळला तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल आणि परिणामी सरकार कोसळू शकते. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या