Home /News /mumbai /

पुन्हा पेटणार राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष?, कोश्यारींकडून नव्या कुलगुरूंचा शोध सुरु

पुन्हा पेटणार राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष?, कोश्यारींकडून नव्या कुलगुरूंचा शोध सुरु

पुन्हा एकदा राज्यपाल (Governor) विरुद्ध राज्य सरकार (State Government) असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई, 05 एप्रिल: पुन्हा एकदा राज्यपाल (Governor) विरुद्ध राज्य सरकार (State Government) असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठ (Mumbai University) कुलगुरु नेमण्याची प्रक्रिया नव्या वादात सापडली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू केला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार 18 एप्रिलला मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट आणि अकॅडेमिक कौन्सिलची बैठक होत आहे. या बैठकीत कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सदस्य नेमला सूचित केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांची वयाची 65 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता येत नाही, त्यामुळे नवे कुलगुरु नेमण्याऱ्या समितीत कोण कोण असावेत यावर 18 एप्रिलच्या बैठकीत चर्चा होईल. तसंच राज्य सरकारने बदल केलेल्या विद्यापीठ विधेयकावर अजूनही राज्यपालांनी सही केली नाही आहे. त्यामुळे या निमित्तानं आता पुनः राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बनवलेल्या विद्यापीठ कायद्याकडे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुर्लक्ष केलं असून (Bhagat Singh Koshyari) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सरकारच्या विद्यापीठ कायद्यानुसार समिती स्थापन करुन ती समिती नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात येणार आहे. कुलगुरु नेमण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार घेतला. मात्र राज्यपालांचे अधिबाधित राहतील, असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला होता. कुलगुरु पदासाठी दोन नावं राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठवण्यात येतील. त्यापैकी एका नावाची निवड राज्यपालांना करावी लागेल, अशी त्याची निवड प्रक्रिया आहे. त्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरीही देण्यात आली होती. पण आता याकडे राज्यपालांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Governor bhagat singh, State government, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या