मुंबई, 22 जून : मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांचा प्रश्नाबद्दल मागणी केली आणि राज्यपालांनीही त्यांच्या निवदेनाची दखल घेऊन मी नक्की लक्ष घालतो असं सांगून आश्वासन दिलं. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या प्रश्नी राज्यपाल काय भूमिका घेता हे पाहण्याचं ठरणार आहे.
आज दुपारी मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, शालिनीताई ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी या शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
'निवासी डॉक्टर एकीकडे कोरोना रुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची (15 जुलै) टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी-डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा', अशी मागणी अमित ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली.
मंदिरात पुजारी नाही तर डिस्पेन्सर देणार तीर्थ; पाहा VIDEO
त्याचबरोबर, परप्रांतातून जे मजूर आता पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत, त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावे, आणि त्यादृष्टीने राज्य सरकारला आपण आदेश द्यावेत', अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.
'आपण मांडलेले विषय महत्वाचे आहेत. मी त्यात लक्ष घालतो' अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं.
तर, 'आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली. "इतर राज्यांना जर चार्टर विमानं मिळू शकतात, तर महाराष्ट्राला का नाही", असा सवाल उपस्थित करत "महाराष्ट्रात येणाऱ्या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीयन लोकांनाच प्राधान्याने महाराष्ट्रात परत आणायला हवं" असं मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
अनलॉक नको रे बाबा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन'
विशेष म्हणजे, कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे, असं प्रशस्तीपत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं. पण, आता त्यांचाच मुलगा आणि पक्षाचा नेता अमित ठाकरे यांनी मात्र आशा सेविकांसाठी मानधन वाढवून मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अमित यांनी पत्र लिहिलं खरं. पण इतर नेत्यांप्रमाणेच कोणत्याही मंत्र्यांच्या भेटीपेक्षा राज्यपाल भेटीसाठी राजभवनच गाठलं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. सुरुवातीला राज्य सरकारवर विश्वास
ठेवणाऱ्या मनसेचा आता भरोसा राहिला नाही की काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.