वांद्र्याच्या सरकारी वसाहतीचा स्लॅब कोसळला, आई आणि मुलगा गंभीर जखमी

वांद्र्याच्या सरकारी वसाहतीचा स्लॅब कोसळला, आई आणि मुलगा गंभीर जखमी

वांद्रे सरकारी वसाहतीत घराचा स्लॅब कोसळला आहे. यात आई आणि मुलगा जखमी झाले आहेत.

  • Share this:

वांद्रे, 12 जुलै : वांद्रे सरकारी वसाहतीत घराचा स्लॅब कोसळला आहे. यात आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. वैशाली सावंत (३०) आणि मुलगा नैतीक सावंत(९) हे दोघेही यात गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी 4:30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. ९ वर्षाच्या नैतिकला १५ टाके पडले आहे. आई आणि मुलगा या दोघांनाही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

थायलंडच्या गुहेतून मुलांना 'असं' काढलं बाहेर, रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO आला समोर

खरंतर वैशाली सावंत या त्यांचा नवरा आणि मुलासोबत त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आल्या होत्या. दरम्यान, घरात एकूण 6 जण होते. त्यात वैशाली त्यांचे पती आणि मुलगा एक खोलीत झोपले होते. आणि अचानक घराचा वरचा स्लॅब कोसळला आणि यात वैशाली आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. यात सुदैवाने त्यांचे पती सुरक्षित आहे.

वारंवार दुरावस्तेची तक्रार करुनही या सरकारी वसाहतींवर कोणताही कारवाई होत नसल्याने आज ही वेळ ओढवली आहे. आता या घटनेनंतर तरी वसाहतींची दुरुस्ती होणार का की सरकार कोणाचं बळी जाण्याची वाट बघणार ?

हेही वाचा...

मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading