मुंबई, 21 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात. पण, आज सभागृहामध्ये लग्नाच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच चिमटा काढला. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.
सभागृहामध्ये आज आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थितीत केला होता. 'आता आमच्या गावात मिल बंद झाली आहे. लग्न कामगारांनी केलं, ते तुटलं आहे. याची जबाबदारी कुणी घेणार आहे का? सरकारने काही तरी करावं, असं बच्चू कडू म्हणाले.
(Nitin gadkari : नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन, 10 कोटींची मागितली खंडणी)
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले, लग्न लावून देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुटलं तरी त्याची जबाबदारी ही सरकारची आहे, पण तुम्ही प्रश्न केला तो तपासून पाहिला जाईल. पण तुम्ही हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून विचारला का, असा मिश्किल चिमटा फडणवीस यांनी काढला.
त्यानंतर लगेच, 'कामाचं राहू द्या, लग्न लावण्याची जबाबदारी ही सरकार घ्यायला तयार आहे, असं फडणवीस म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.
(माझं काही चुकलं का? म्हणत पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या...)
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 'आदित्य जी आधी लगीन कोंढाण्याचं' असं म्हणत चिमटा काढला.
'कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, हे मी अनुभवानतून बोलतो' असं फडणवीस म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हश्शा पिकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.