S M L

कर्जमाफीसाठी सरकार शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेणार

कर्जमाफी देण्याआधी शेतकऱ्यांकडून अटी शर्थींचा फाॅर्म भरून घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2017 07:11 PM IST

कर्जमाफीसाठी सरकार शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेणार

23 जुलै : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलीये. पण रोज नवनवीन बदलामुळे वादात कर्जमाफीचा निर्णय वादात अडकलाय. आता भरातभर म्हणजे कर्जमाफी देण्याआधी शेतकऱ्यांकडून अटी शर्थींचा फाॅर्म भरून घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कर्जमाफीमध्ये नव्या निकषाबद्दल घोषणा केली. मागील कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत बनावट खाते उघडून कर्जमाफी लाटल्याची प्रकरणं समोर आलीये. त्यामुळे याची खबरदारी म्हणून कर्जमाफी लाभधार शेतकऱ्यांकडून फाॅर्म भरून घेण्यात येणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

फॉर्ममध्ये पाच ते सहा साधे प्रश्न असतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांना आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. शिवाय घरातल्या सगळ्या सदस्यांचे बँक खात्याचे तपशील द्यावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 07:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close