अखेर सरकारला चूक उमजली, इंदू मिलच्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकरांना दिले निमंत्रण

अखेर सरकारला चूक उमजली, इंदू मिलच्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकरांना दिले निमंत्रण

इंदु मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईतील दादर परिसरात  इंदु मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांनाच निमंत्रण न दिल्यामुळे वाद पेटला होता. अखेर या वादावर पडदा टाकत ऐनवेळी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिलमध्ये भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्याक्रम  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोजक्यात 16 जणांना बोलावण्यात आले आहे. पण,  इंदु मिलसाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर यानांही आमंत्रित करण्यात आलं नव्हते.  आनंदराज यांच्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारने ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. मोठं आंदोलन करत इंदू मिलचे दरवाजे आणि पोलिसांचा मोठा ताफा फोडत आंदोलन केलं होतं. सरकारने बाबासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी उमटली होती.

अखेर 11.30 वाजेच्या सुमारास एमएमआरडीएकडून एक पत्रक प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 'आपण स्मारकाच्या कामाचा दर्जेवर प्रश्न उपस्थितीत केले होते. त्यामुळे मला न बोलवण्याचा प्रयत्न होता. पण आता सरकारकडून निमंत्रण मिळाले आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास निकृष्ट कामाची बाजू मांडणार आहोत, असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्षांनेत्यांनाही या कार्यक्रमाची माहिती आणि निमंत्रण देण्यात आले नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे.  दोघेही नेते मुंबईत असून निमंत्रण देण्यात आले आहे. तर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकर हे सध्या पुण्यात आहेत.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर , स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थिती राहणार आहे.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या