मुंबईत सर्वांसाठी लोकल केंव्हा सुरू होणार? BMC आयुक्तांनी दिलं हे उत्तर

मुंबईत सर्वांसाठी लोकल केंव्हा सुरू होणार? BMC आयुक्तांनी दिलं हे उत्तर

'सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. सध्या लक्षणे नसलेल्या पण कोविड असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.'

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर: मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा अजुनही सुरू झालेली नाही. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनाच प्रवासासाठी परवानगी आहे. त्यातच जनजीव पूर्ववत सुरू होत असल्याने सर्वांसाठी लोकल केव्हा सुरू होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. जवळपास सर्वच कार्यालये सुरू झाल्याने लोकांचं ऑफिसमध्ये जाण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत सर्वांसाठी लगेच सुरू होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

आयुक्त म्हणाले, सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. लोकांच्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. सध्या लक्षणे नसलेल्या पण कोविड असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याच बरोबर आता ख्रिसमस आणि नवी वर्षाचं आगमनही होणार आहे. त्यावेळी गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे नवीन वर्षामध्येच याबाबतीत निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सरकार यावर योग्य वेळी निर्णय घेईल. हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला चिंता असून लोकल सेवा पूर्ववत झाली तर गर्दी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे सरकार तातडीने लोकल सेवा सुरू करण्याच्या तयारीत नाहीत असेच संकेत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, महिला, वकील यांनाच विशिष्ट वेळेत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 10, 2020, 4:58 PM IST
Tags: BMC

ताज्या बातम्या