S M L

राज्य सरकार बनवतंय पशू अॅप

राज्य सरकारने आता जनावरांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक खास अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही सर्व जनावरांचे अॅप बनवायला सुरुवात केली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 14, 2017 01:14 PM IST

राज्य सरकार बनवतंय पशू अॅप

रफिक मुल्ला, मुंबई, 14 आॅगस्ट : राज्य सरकारने आता जनावरांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक खास अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही सर्व जनावरांचे  अॅप बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बकरी ईदच्या कुर्बानी होणाऱ्या सर्व बकऱ्यांच्या नोंदी होऊ शकतील, दोन्ही संस्थांचे हे निर्णय वादाला कारण ठरले आहेत.

राज्यातल्या जनावरांच्या बाजारातून कोणतेही जनावर थेट कसायाला विकले जाणार नाही असा कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि वाद सुरू झाला, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही आणि काही दुरुस्त्यांसह पुन्हा येणार आहे, त्यातचं आता राज्य सरकारचा पशु संवर्धन विभाग खास पशु अॅप बनवणार आहे तर पालिकेने अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

खरे तर हा निर्णय सर्व नोंदी असायला हव्यात म्हणून चांगला आहे, ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी होईल, त्या ठिकाणी मुंबईत महापालिकेचा स्वच्छता विभाग वेळीच स्वच्छताही करू शकेल, मुस्लिम समाजाच्या मुद्यावर काम करणारे काही पक्ष याचे स्वागत करताना दिसत आहेत, तर काहींचा आरोप आहे की हा निर्णय नोंदीच्या पुढे जाऊन मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने केला गेला आहे.या विरोधात न्यायालयात जाण्याचा विचारही केला जातोय.एकूण या निर्णयावरही वाद वाढणार असे दिसते आहे, त्यातच बकरी ईद जवळ असल्याने थोडयाच काळात या निर्णयाच्या अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे, त्यातूनही वाद आणि पर्यायाने राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 12:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close