मोठी बातमी, कोरोनाबाधित रुग्णांबाबत सरकारने काढले नवे आदेश

मोठी बातमी, कोरोनाबाधित रुग्णांबाबत सरकारने काढले नवे आदेश

'कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर 30 मिनिटांत मृतदेह वॉर्डाबाहेर काढण्यात यावा आणि 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार केले जावे'

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देण्याबाबत राज्य सरकारने एक नियमावली प्रसिद्ध करत आदेश दिले आहे.

यापुढे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पण कोणतीही गंभीर लक्षणं नसलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करता येणार नाही. अशा रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाइन चा शिक्का मारून घरी पाठवण्यात येणार आहे. या रुग्णांना पुढील 14 दिवस घरीच थांबावे लागणार आहे.  या निर्णयामुळे रुग्णालयात गर्दी कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा -  : 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

याबद्दल सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकाची अंमलबजावणी 2 मेपासून सकाळी 10 वाजेपासून केली जाणार आहे. या पत्रात स्पष्ट केलं आहे की,  कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयातून परत पाठवता येणार नाही. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला तपासलाच पाहिजे, असा महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे.

 हेही वाचा - लॉकडाऊनंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, बंद होऊ शकते 'ही' सेवा

कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर 30 मिनिटांत मृतदेह वॉर्डाबाहेर काढण्यात यावा आणि 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार केले जावे, असे निर्देशही या देण्यात आले आहे. तसंच, एखाद्या रुग्णाच्या थुंकीचे नमुने घेतले तर 12 तासांत त्याचा अहवाल मिळणं बंधनकारक असणार आहे, असंही यात स्पष्ट केलं आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 9915 वर

दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात बुधवारी एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. सध्या राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 30, 2020, 1:16 PM IST

ताज्या बातम्या