31जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा,राज्यपालांचे आदेश

31जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा,राज्यपालांचे आदेश

राज्यपालांनी परीक्षाकामांची चांगलीच झडती आहे. आत्तापर्यंत फक्त २० टक्के उत्तरपत्रिकांचंच मूल्यांकन झाल्यामुळे राज्यपालांनी नाराजीसुध्दा व्यक्त केली आहे.

  • Share this:

05 जुलै : राज्यपालांनी परीक्षाकामांची चांगलीच झडती आहे. आत्तापर्यंत फक्त २० टक्के उत्तरपत्रिकांचंच मूल्यांकन झाल्यामुळे राज्यपालांनी नाराजीसुध्दा व्यक्त केली आहे.  शिवाय येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा, असे आदेशही दिले.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील सर्वच विषयांच्या उत्तरपत्रिकांचं संगणकीय मूल्यांकन करण्याच्या कुलगुरू संजय देशमुख यांच्या अट्टहासापोटी परीक्षांचे निकाल  लांबल्याने अखेर विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी विद्यापीठाच्या परीक्षाकामांची झाडाझडती घेतली.

कुलगुरू संजय देशमुख व परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांना पाचारण करून राज्यपालांनी उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेतला आणि येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा, असे आदेशही दिले.

First published: July 5, 2017, 11:55 AM IST

ताज्या बातम्या