मुंबई, 11 मार्च : सरकारी कर्मचाऱ्यांना संभ्रम निर्माण करणारा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.राज्यात लागू कऱण्यात आलेला 5 दिवसांचा आठवडा रद्द होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या मेसेजमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती भरली आहे. 1 एप्रिलपासून पुन्हा 6 दिवसांचा आठवडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्यानं आणि कर्मचारी आळस करत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय महाराष्ट्रात लागू झाला आहे का? याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम आहेत. ह्या मेसेजमागचं नेमकं सत्य काय आहे जाणून घ्या.
सिक्कीम सरकारनं 5 दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याऐवजी दुसरा आणि चौथा शनिवार कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. 28 मे 2019 रोजी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री प्रेमसिंह यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा असेल अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणीही कऱण्यात आली. मात्र कर्मचारी काम करत नसल्याचं लक्षात आल्यानं या निर्णयात बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून पुन्हा एकदा 6 दिवसांचा आठवडा होणार आहे. कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
हे वाचा-कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्यायले विषारी दारू, इराणमध्ये 44 जणांचा मृत्यू
दरम्यान 29 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य सरकारनंही 5 दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्या बदल्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दररोजच्या कामाची 45 मिनिटं वाढवण्यात आली आहेत. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता म्हणजेच शाळा, रुग्णालये, पोलीस इत्यादी. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांच्या आठवड्याचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनं हा निर्णय रद्द केला नाही. 5 दिवसांच्या आठवड्याचा निर्णय फक्त सिक्कीम सरकारनं रद्द केला आहे.
हे वाचा-मुंबई : पतीने रात्री मागितला मोबाइल, पत्नीने नकार दिल्याने केले किळसवाणे कृत्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.