Home /News /mumbai /

Google Map च्या नादात थेट कार पुलावरून पाईपलाईनवर कोसळली

Google Map च्या नादात थेट कार पुलावरून पाईपलाईनवर कोसळली

हल्ली प्रत्येक खासगी टॅक्सी, रिक्षामध्ये गुगल मॅप हमखास पाहण्यास मिळतो. पण गुगल मॅपद्वारे मार्ग शोधणे एका ड्रायव्हरला चांगलेच भारी पडले

    रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 07 जानेवारी : गुगल मॅपद्वारे आपण हव्या त्या ठिकाणी मार्ग शोधत सहज पोहोचतो. हल्ली तर प्रत्येक खासगी टॅक्सीमध्ये गुगल मॅप हमखास पाहण्यास मिळतो. पण गुगल मॅपद्वारे मार्ग शोधणे एका ड्रायव्हरला चांगलेच भारी पडले. ड्रायव्हरने थेट कार पुलावरून पाईपलाईनवर उतरवली. त्याचं झालं असं की, गुजरातमधील पाच मित्र हे भिवंडी तालुक्यातील लाप गावच्या हद्दीतील  फ्लिमसिटी पाहण्यासाठी मारूती सुझुकीच्या स्विफ्ट डिझायर गाडीने येत होते. आता नवीन ठिकाणी येत असल्यामुळे रस्ता शोधण्यासाठी ड्रायव्हरने गुगल मॅपमध्ये पत्ता टाकला आणि भिवंडीकडे निघाला. जेव्हा भिवंडी तालुक्यातील खंबाळा इथं कार पोहोचली तेव्हा भलताच प्रकार घडला. खंबाळा - कुंदे रोडवरील   पुलावरून  वळण घेताना मुंबईला पाणी पुरवठा  करणाऱ्या तानसा पाईप लाईनवरच त्यांची कार कोसळली. कार थेट पुलावर कोसळल्यामुळे कारच्या छताला मोठे नुकसान झाले. या अपघातात चार जण  किरकोळ जखमी झाले. तर  एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार जेव्हा पोलिसांना कळला तेव्हा तेही चक्रावून गेले.  iphone घेण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला, त्यानंतर पठ्ठ्याने असं काही केलं की थेट पोहोचला तुरुंगात! दरम्यान, नवी दिल्लीतही डोकं चक्रावून सोडणारी घडना घडली आहे. आयफोन खरेदी करण्याची सर्वांची इच्छा असते. मात्र, आयफोनच्या किंमती या दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आयफोन विकत घेण्यासाठी किडनी विकण्याचे मिम्स व्हायरल होत असतात. मात्र 12वीत शिकत असलेल्या एका मुलानं आयफोन खरेदी करण्यासाठी चक्क ATM मशीन फोडली. दादरीमध्ये 12वीत शिकत असलेल्या मुलानं ATM मशीन फोडून पैसे चोरुन नेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दादरी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक दिनेशकुमार सिंह यांनी सांगितले की, 31 डिसेंबर रोजी रेल्वे रोडजवळील ओरिएंटल बँकेचे ATM तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा अहवाल नोंदवून पोलिस या घटनेचा तपास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग असे या अटक केलेल्या मुलाचे नाव असून तो 12वीत शिकत होता. त्याला रात्री दादरी येथे असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अटक केलेल्या विद्यार्थ्याने आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मान्य केले. आरोपींकडून एटीएम तोडण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड आणि चाकूही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Bhiwandi

    पुढील बातम्या