गुडविन ज्वेलर्सला ऐन दिवाळीत टाळं, हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

डोंबिवलीकरांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 04:19 PM IST

गुडविन ज्वेलर्सला ऐन दिवाळीत टाळं, हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

डोंबिवली,26 ऑक्टोबर:ऐन दिवाळीत डोंबिवलीच्या गुडविन ज्वेलर्सला कुलूप लागलं आहे. मागील सहा दिवसांपासून कोणतंही कारण न देता हे दुकान बंद करण्यात आलंय. डोंबिवली पूर्वेच्या मानपाडा रोडवर गुडविन ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये डोंबिवलीकरांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. 21 तारखेला हे दुकान दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना दुकानाबाहेर लावत हे दुकान बंद करण्यात आलं. मात्र, त्यानंतर सहा दिवस उलटूनही हे दुकान सुरू झालेलं नाही. त्यामुळं गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांनी दुकानाबाहेर गर्दी केली आहे. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स अशाचप्रकारे बंद करण्यात आलं होतं, त्यातही कोट्यवधी रुपये अडकले होते. सध्या पीएमसी घोटाळा गाजत असून त्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सकडूनही अशीच फसवणूक होते का? अशा विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत.

Close for stock take ची नोटीस

Close for stock take ची नोटीस लावून ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्सच्या दुकांनांना टाळं लागल्यानं गुडविन ज्वेलर्सच्या लाखो ग्राहंकांना मोठा झटका लागलाय. ठाण्यात गडकरी रंगायतन येथील दुकान देखील बंद आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली एवढच नाही तर देशभरातील सर्वच गुडविन ज्वेलर्सच्या दुकानांना टाळं लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांच्या मोठा घोटाळा झालाय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दिवाळाच्या तोंडावर गेली 3 दिवस ठाणे जिल्ह्यातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. शेवटी आज दुकानावर close for stock take ची नोटीस लावली याची माहिती गुडविन ज्वेलर्सच्या ग्राहकांना कळताच ग्राहकांनी सर्वच गुडविन ज्वेलर्स दुकाना बाहेर मोठी गर्दी करायला सुरुवात केली. कारण फक्त सोनं विक्री एवढेच व्यवहार या गुडविन ज्वेलर्समध्ये चालत नव्हते तर, कोट्यावधी रुपयांची भिशी, मासिक हप्त्यांवर सोनं, सोना हिऱ्यांत गुंतवणूक असे विविध व्यवहारांमुळे लाखो ग्राहक या गुडविन ज्वेलर्सशी जोडले गेले होते. पण आता हे दुकानाला टाळं लागल्याने गुडविनचे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत गुडविन ज्वेलर्सशी संपर्क साधला, असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...