News18 Lokmat

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: मालगाडीचे डबे घसरले; मध्य रेल्वेने या एक्स्प्रेस गाड्या केल्या रद्द! Goods Train Derailed | Train Derailed | Mumbai-Pune train services | Mumbai-Pune | Karjat-Lonavala

सोमवारी पहाटे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एका मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 08:12 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: मालगाडीचे डबे घसरले; मध्य रेल्वेने या एक्स्प्रेस गाड्या केल्या रद्द! Goods Train Derailed | Train Derailed | Mumbai-Pune train services | Mumbai-Pune | Karjat-Lonavala

खंडाळा, 1 जुलै: मुंबई शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सोमवारी पहाटे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एका मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका मालगाडीचे 15 ते 16 डबे मंकिहिल ते जामरुंग केबिन दरम्यान घसरले. यामुळे मध्य रेल्वेची मिडल लाईन तसेच डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र जोपर्यंत डबे हटवले जात नाहीत तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहील.

पावसामुळे रेल्वे वाहतूक देखील उशिराच सुरु आहे. त्याचा फटका लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसत आहे. अशातच खंडाळ्याजवळ सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वेची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रेल्वे रुळाला तडे गेल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. घसरलेले डबे हटवण्यासाठी टुल व्हॅन (विशेष रेल्वे) घटनास्थळी दाखल झाली आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी 200 ते 250 कर्मचारी काम करत आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

> मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

Loading...

> मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस

> मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस

> पुणे भुसावळ एक्स्प्रेस

> पनवेल पुणे पॅसेंजर

> पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस

> पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस

याशिवाय मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेसची ही गाडी नाशिक रोड स्थानकापर्यंतच चालवण्यात आली आहे. मालगाडीचे डबे हवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने जातात त्या इगतपुरी मार्गे वळवण्यात आल्या आल्याचे मध्य रेल्वेने ट्विटवर सांगितले आहे.

पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...