Home /News /mumbai /

अलविदा शेरा! पोलीस दलातील श्वानाच्या निधनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख झाले भावुक, म्हणाले...

अलविदा शेरा! पोलीस दलातील श्वानाच्या निधनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख झाले भावुक, म्हणाले...

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं जेव्हा आगमन होतं, शेरा ड्यूटीवर हजर होत असे...त्याच्या कुशलतेचं सर्वांनाचा खूप कौतुक होतं.

    नागपूर, 4 जानेवारी : पोलिसांमधील डॉग स्क्वॉडकडे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. आतापर्यंत राज्यातील अनेक श्वानांनी मोठ मोठ्या गुन्ह्यात सहकार्य करुन आरोपीला पकडून दिलं आहे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी असते. नागपूरातील शहर पोलिसांना अनेक गुन्ह्यांत तपासासाठी मोलाचं सहकार्य करणाऱ्या शेरा नामक श्वानाचे दुःखद निधन झाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन लिहिलं आहे की, नागपूर शहर पोलिसांना अनेक गुन्ह्यांत तपासासाठी मोलाचं सहकार्य करणाऱ्या शेरा नामक श्वानाचे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! दिल्ली बॉम्ब कॉल आणि घातापाताच्या अनेक कारवायांत गेली 9 वर्षे शेराने दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. गेल्या 9 वर्षांपासून शेरा BDDS मध्ये काम करीत होता. यादरम्यान त्याला एका आजाराने ग्रासलं होतं. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शासकीय नियमांनुसार सलामी देऊन पोलीस मुख्यालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेराला हिप डिस्पेस्पिया या आजारानं ग्रासलं होतं. गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सॅबोटेज चेक, वीवीआयपी बंदोबस्त आणि महत्त्वाच्या घटनांमध्ये त्याचं महत्त्वपूर्ण काम असे. 30 डिसेंबर रोजी त्याची तब्येत अचानक खालावली. रविवारी सकाळी आजारातच त्याने जीव सोडला. सांगितलं जाते की, सीजेआय शरद बोबडे जेव्हा आपल्या निवासस्थानी जात तेव्हा शेराकडे संपूर्ण परिसराची तपासणी करण्याची जबाबदारी होती. अशात एकेदिवशी त्यांनी शेराची परीक्षा घेतली. त्यांनी घरात फटाके लपवले आणि शेराला फटाके शोधण्याचं काम दिलं. काही मिनिटात शेराने घरातून फटाके शोधून काढले. त्याची कुशलता पाहून सर्वांनाच कौतुक वाटलं. जेव्हा सीजेआय येत असत तेव्हा शेरा ड्यूटीवर हजर होत होता. ते आपल्या हाताने शेराला बिस्कीट खाऊ घालत. 2018 मध्ये महाराष्ट्र पोलीस ड्यूटी मीटमध्ये आयोजित स्पर्धेत शेराने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. तर नागपूर पोलीस ड्यूटी मीटमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anil deshmukh, Dog

    पुढील बातम्या