• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Coronavirus: मुंबईकरांनी करून दाखवलं! झोपडपट्टी परिसरात अवघे 3 कंटेन्मेंट झोन

Coronavirus: मुंबईकरांनी करून दाखवलं! झोपडपट्टी परिसरात अवघे 3 कंटेन्मेंट झोन

मुंबईतील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण होत असून आता कंटेन्मेंट झोन सुद्धा एक-एक करुन कमी होऊ लागले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 31 जुलै : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेत मुंबईतील (Mumbai) झोपडपट्टी विभागात अक्षरश: थैमान घातले होते. याच झोपडपट्टी परिसरातून (Mumbai slum) आता मोठा दिलास देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये केवळ 2 वॉर्ड्समध्ये 3 कंटेन्मेंट झोन आता शिल्लक राहिले आहेत. म्हणजेच इतर वॉर्डमधील झोपडपट्टी विभाग हे कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आहेत. तर काही इमारतींचा परिसर अद्यापही कोरोनामुळे त्रासदायक ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईतील कोरोनाच्या स्थितीचे आकडे पाहून लक्षात येते की, आता खूपच कमी प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत आहे. मात्र, इमारतींचे मजले हे सुरक्षिततेच्या कारणास्तव सील करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीच्या मजल्यावर एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जात नाही तर केवळ मजला सील करण्यात येतो. 18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काहीतरी, कोरोनामुळे झालं उघड इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. आता मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ही 300 ते 400 रुग्णांच्या आसपास आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन केल्यास रुग्णसंख्या आणखी खाली येण्यास मदत होईल. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 1434 दिवसांवर पोहोचला आहे. 22 वॉर्डमध्ये एकही कंटेन्मेंट झोन नाही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची लक्षात घेता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 24 वॉर्डपैकी 22 वॉर्डमध्ये एकही कंटेन्मेंट झोन नाहीये. केवळ गोवंडी परिसरात 2 आणि कांदिवली परिसरात 1 कंटेन्मेंट झोन आहे. येथे 0.31 लाख लोकसंख्या आहे. मायक्रो कंटेन्मेंट जोनचं बोलायचं झालं तर मुंबईत एकूण 55 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. म्हणजेच 55 इमारतींपैकी 5 इमारतींमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. नवभारत टाइम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे. 1636 फ्लोर सील मुंबईतील एकूण इमारतींपैकी 1636 मजले हे सील करण्यात आले आहेत. यावरुन अंदाज वर्तवता येऊ शकतो की, मुंबईतील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: