मुंबई, 17 जानेवारी : राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे द्वारे चालवली जाणारी सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे आणि त्यातून देशाची राजधानी अन्य महत्वाच्या शहरांशी जोडली जाते. पूर्णपणे वातानुकूलित, या गाड्या सुपरफास्ट आहेत आणि केवळ प्रमुख स्थानकांवर थांबतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 19 जानेवारीपासून दररोज धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पहिल्या 22221/22222 राजधानी एक्सप्रेसचे दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी उद्घाटन झाले. एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत, तीन वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, आठ वातानुकुलीत तृतीय श्रेणी आणि एक पेंट्री कार असलेली ही द्वि-साप्ताहिक ट्रेन दर बुधवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून 14.50 वाजता सुटत असे आणि कल्याण नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झांसी आणि आग्रा कॅन्ट इत्यादी स्थानकावर थांबत हजरत निजामुद्दीनला दुसर्या दिवशी 10.20 वाजता पोहोचत असे.
ट्रेनला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की गाडी सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच दोन अतिरिक्त वातानुकुलीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत तृतीय श्रेणीचे डबे जोडले गेले. ठाणे आणि कल्याणच्या पलीकडे मध्य रेल्वेच्या उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन आशीर्वादापेक्षा कमी नव्हती, कारण त्याद्वारे त्यांना कल्याण येथे बोर्डिंग सुविधेसह राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाला होता.
मध्य रेल्वेच्या पथकाने पुश-पुल मोडमध्ये ट्रेन चालवण्याचा सर्वात अनोखा उपाय अंमलात आणला, म्हणजेच गाडीच्या समोरच्या बाजूला एक इंजिन व पाठीमागे एक इंजिन जोडून ट्रेन चालवणे ज्यायोगे घाट विभागात बंकर जोडणे व काढणे टाळता आले आणि मौल्यवान वेळेची बचतीसह त्याद्वारे प्रवासाची वेळ देखील कमी झाली. मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस ही पुश-पुल तंत्रज्ञानावर चालणारी पहिली रेल्वे बनली जी सरकारच्या “मिशन रफ्तार” ला सक्षम बनवते आणि त्यामुळे रेल्वेच्या इतिहासामधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठले.
ही गाडी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 16.10 वाजता सुटली आणि दुसर्या दिवशी 10.05 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचली. परतीच्या प्रवासात ही गाडी हजरत निजामुद्दीनहून 17.15 वाजता सोडली आणि दुसर्या दिवशी 11.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचली. ही गाडी एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत, पाच वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, अकरा वातानुकुलीत तृतीय श्रेणी आणि एक पेंट्री कारसह धावत आहे. या ट्रेनची मागणी इतक्या प्रमाणात वाढली की आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या ट्रेनची वारंवारता दिनांक 13.9.2019 पासून आठवड्यातून आठवड्यातून 4 वेळा वाढविली गेली. या ट्रेनला देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 13.9.2019 रोजी हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
वर्ष 2020 मध्ये सर्व देशभर असलेला कोविड – 19 साथीचा रोगाच्या च्या रूपाने आणखी एक मोठे आव्हान उभारले आणि प्रवाशांच्या आणि कर्मचार्यांच्या हिताच्या दृष्टीने कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वेने मेल / एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या निलंबित केल्या.
मध्य रेल्वे, लॉकडाउन नंतर आणि अनलॉक कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या हितासाठी, राजधानी एक्सप्रेसची सेवा दिनांक 30.12.2020 पासून विशेष रेल्वे म्हणून सुरू केली. 01221/01222 मध्ये सुधारित क्रमांक असलेली ही विशेष ट्रेन आठवड्यातून 4 दिवस पूर्वीच्याच संरचना आणि थांब्यांसह धावते आणि दिनांक 9.1.2021 पासून ह्या गाडीला ग्वाल्हेर येथेही थांबा देण्यात आला.
2021 साल मध्य रेल्वेने सकारात्मकपणे सुरू केली आणि राजधानी एक्स्प्रेसच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त या ट्रेनची वारंवारता आठवड्याच्या 4 दिवसांवरून दररोज करण्यात आली. याचा निश्चितच राजधानीच्या शहरासाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना तसेच या प्रतिष्ठित ट्रेनच्या मार्गावरील थांब्यांच्या स्थानकांना नक्कीच फायदा होईल.
ट्रेनमध्ये कोणाला मिळणार प्रवेश?
सध्या ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज 16.00 वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी 09.55 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते. परतीच्या दिशेने, हजरत निजामुद्दीनहून दररोज 16.55 वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी 11.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचते. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग करता येते. वरील राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या थांब्यांच्या ठिकाणांवरील विस्तृत माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करू शकतात.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड - 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावं, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.