मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू

मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुंबईतील मैदाने, उद्याने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुंबईतील मैदाने, उद्याने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुंबईतील मैदाने, उद्याने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत मुंबईतील (Mumbai) सर्व उद्याने (Gardens), मैदाने (Play grounds), चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कोविड संबंधित सर्व नियमांचे अर्थात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक पत्रकही काढलं आहे. (BMC allows opening of grounds, gardens, beaches & seafronts from 6 am to 10 pm)

आपल्या पत्रकात मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे की, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निर्बंधांबाबत यापूर्वी वेळोवेळी पारित केलेले आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. तथापि, राज्य शासनाच्या आदेशातील अनुक्रमांक 8मध्ये दिलेल्या अधिकारानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे केवळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

महाराष्ट्रात Delta Plus व्हेरिएंटचा धोका वाढला; विषाणूचे तीन वेगवेगळे रूप आढळले

ब्रेक-द-चेन अंतर्गत राज्य शासनाने 11 ऑगस्ट 2021 रोजी पारित केलेल्या आदेशातील इतर सर्व तरतुदी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुढील आदेशापर्यंत जशाच्या तशा लागू होतील. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे आणि 11 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशातील नमूद केल्यानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधितांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai