मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Good News : ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार

Good News : ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

ठाणे, 29 सप्टेंबर : ठाणे जिल्ह्यातील (Thane News) वाहतूक कोंडीचा (Traffic Issue) प्रश्न सोडवण्यासाठी शहराच्या वेशीबाहेर अवजड वाहनांच्या नियमनासाठी पार्कींग प्लाझा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे ठाण्याती वाहतुकीच्या खोळंब्यावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने जागांची निश्चिती करण्यासाठी आज नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज उरण, खारेगाव, दापोडी, उरण, भिवंडी, या भागाचा दौरा करून पार्कींगसाठी उपलब्ध असलेल्या जागांची पाहणी केली.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीच आयोजन केलं होतं. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र पार्कींग लॉट तयार करून तिथे वाहने अडवून ठरलेल्या वेळेप्रमाणे सोडण्याचे निश्चित करण्यात आले होते. (Good News ! Action plan prepared to reduce traffic congestion in Thane)

उरण जेएनपीटीमधून निघणारी वाहने मोठ्या प्रमाणात ठाणे मार्गे गुजरातकडे रवाना होत असल्याने सिडकोच्या हद्दीतील मोकळ्या जमिनीचा आढावा घेतला. यावेळी राजदान फाटयाजवळील 100 हेक्टर जागा तसेच अन्य काही जागांची शिंदे यांनी पाहणी केली. या जागांचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जेएनपीटीच्या वतीने एक्स्पोर्टसाठी त्यांच्या सीएफएस म्हणजेच सेन्टरलाईज फ्रेट सेन्टर मध्ये जाण्यापासून अडवू नये अशी विनंती करण्यात आली. मात्र सीएफएस केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना वेगवेगळ्या रंगांचे स्टिकर्स लावून त्यांचे सिडको, जेएनपीटी आणि नवी मुंबई आणि रायगड पोलीस यांच्या माध्यमातून नियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या साऱ्या यंत्रणांची एकत्रित टीम तयार करून टप्प्याटप्प्याने ही वाहने रात्री 11 ते 6 या वेळेत सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

हे ही वाचा-नाशिक- सुरत-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात दरड कोसळली

ठाणे शहराच्या सुरुवातीला खारेगाव टोलनाक्यालगतच्या दोन्ही बाजूच्या जमिनीची देखील शिंदे यांनी पाहणी केली. या जमिनीवर भराव टाकून त्यानंतरच त्या पार्कींग लॉट म्हणून वापरता येणे शक्य असल्याने शक्य तेवढ्या लवकर या जागेचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि एमएसआरडीसीला दिले.

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याठिकाणी सोनाळे आणि दापोडा या दोन गावातील जागांची पाहणी करून या जागा पार्कींग लॉटसाठी उपलब्धता तपासण्यात अली. तसेच मनोर भिवंडी मार्गावरून गुजरातकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक ठाण्याकडे येत असल्याने भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील पार्कींग साठी उपलब्ध होऊ शकतील आशा संभाव्य जगाची पाहणी शिंदे यांनी केली.

First published:

Tags: Eknath Shinde, Thane, Traffic