पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : रोजगाराच्या संधी लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारीचं संकट तरुणांसमोर गडद होत चाललं आहे. अशातच पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणमध्ये पद भरती सुरू आहे.

कोणत्या पदासाठी कोणाला संधी?

पदाचे नाव : सहायक संचालक – आईसी 1 पद

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – आईसी 1 पद

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – टीआय 1 पद

शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – एसटीआय 1 पद

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस आणि अनुभव

पदाचे नाव : भांडार अधिकारी 1 पद

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी 1 पद

शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र/समाजशास्त्र/समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) – 1 पद

शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) – 1 पद

शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव

पदाचे नाव : सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – 3 पदे

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : संगणकसाक्षर स्टेनो – 2 पदे

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : कमाल 60 वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2020

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2G5NFJS या लिंकवर अथवा http://www.mahasacs.org या संकेतस्थळाला भेट द्या

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, ॲकवर्थ लेप्रसी कॉम्पलेक्स, वडाळा पुलाजवळ, आर.ए.किडवई रोड, वडाळा (प) मुंबई – 400031

Published by: Akshay Shitole
First published: October 31, 2020, 7:12 AM IST

ताज्या बातम्या