GoAir चा प्रताप...विमानाच्या लँडिंगनंतरही दारं बंद, प्रवाशांचा कोंडला श्वास!

GoAir चा प्रताप...विमानाच्या लँडिंगनंतरही दारं बंद, प्रवाशांचा कोंडला श्वास!

अर्ध्या तासानंतर विमानाची दारं उघडण्यात आली आणि प्रवाशींनी मोकळा श्वास घेतला. एवढही होऊनही अधिकाऱ्यांनी प्रवाशांना नेमकं कारण सांगितलं नाही त्याबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

  • Share this:

मुंबई, ता.25 नोव्हेंबर : लखनऊवरून मुंबईत आलेल्या GoAir च्या प्रवाशांचा श्वास रविवारी रात्री कोंडला गेला. विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर अर्धा सात दरवाजे उघडलेच गेले नाहीत. या काळात बराचवेळ विमानातला 'एसी'ही बंद होता. त्यामुळं प्रवाशांचा श्वास कोंडला गेला. प्रवाशांनी विचारणा केल्यानंतरही विमानातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मात्र कुठलंही कारण सांगण्याची तसदी घेतली नाही. CNN NEWS18 च्या प्रतिनिधी विनया देशपांडे याच विमानाने प्रवास करत होत्या. त्यांनी ही माहिती 'News18 लोकमत'ला सांगितली.

विनया देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार GoAir चं G8 396 हे लखनऊवरून येणारं विमान मुंबई विमानतळावर 8.45 च्या सुमारास दाखल झालं. मात्र दरवाजे काही उघडण्यात येत नव्हते. सुरवातीला प्रवाशांना काही वाटलं नाही. मात्र नंतर 'एसी' बंद झाला. लाईट्सही बंद करण्यात आले. विमानात अतिशय कमी प्रकाश होता.

प्रवाशांना काहीच सूचना देण्यात येत नव्हती. वीस मिनिटं उलटून गेल्यानंतर लहान मुलं आणि प्रवाशांना त्रास व्हायला लागला. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न विचारायला सुरूवात केल्यानंतर एसी सुरू केला गेला. तोपर्यंत प्रवाशी ताटकळत होते. अर्ध्या तासानंतर दारं उघडण्यात आली आणि प्रवाशींनी मोकळा श्वास घेतला. एवढही होऊनही अधिकाऱ्यांनी प्रवाशांना नेमकं कारण सांगितलं नाही त्याबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत घटनच्या चौकसीची मागणी केलीय.

 

 

 

VIDEO: नाशिकमध्ये बाईक स्टंटचा थरार, जिंकण्यासाठी बायकर्सची चढाओढ

First published: November 25, 2018, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading