Home /News /mumbai /

कार आणि मोटरसायकलची धूम स्टाईल रेसिंग ठरली जीवघेणी, गोव्यात 3 मुलांचा मृत्यू

कार आणि मोटरसायकलची धूम स्टाईल रेसिंग ठरली जीवघेणी, गोव्यात 3 मुलांचा मृत्यू

वेगाच्या धुंदीत गाड्या चालवत असताना सर्वच तरुण बेभान झाले होते. त्याच वेळी कार चालवत असलेल्या मुलाचा कारवरचा ताबा सुटला आणि कार पठाराच्या शेजारी असलेल्या दरीत कोसळली.

    अनिल पाटील, पणजी 09 मार्च : धूम स्टाईल रेसिंग करणं हे मुलांच्या जीवावर बेतलं आहे. गोव्यातल्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात अफाट वेगात मोटरसायकल आणि कारची रेसिंग जीवघेणी ठरली. रेसिंग करताना अपघात झाला आणि या अपघातात गोव्यातल्या वेर्णा इथं तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही मुलं नववी आणि दहावीच्या वर्गातली आहेत. दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या जवळ असलेल्या पठारावर हा अपघात झाला. या ठिकाणी मोठे पठार असून कायम तिथे अनेक तरुण मोटरसायकल आणि कारची रेसिंग करत असतात. अशा एका ग्रुपचा थरार सुरु असताना हा अपघात झाला आणि तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. रोहन सिक्वेरा, इथन फर्नांडिस आणि जोशुवा बारेटो हे आपल्या मित्रांसोबत रेसिंगसाठी या पठारावर येत होते. या आधीही त्यांनी अशीच रेस खेळल्याची माहिती पुढे आलीय. हे सर्व मित्र सुसाट वेगात गाड्या चालवत होते. वेगाच्या धुंदीत गाड्या चालवत असताना सर्वच तरुण बेभान झाले होते. त्याच वेळी कार चालवत असलेल्या मुलाचा कारवरचा ताबा सुटला आणि कार पठाराच्या शेजारी असलेल्या दरीत कोसळली. मराठीत भाषण न केल्याने शिवसेनेकडून अपमान, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या झेनचा आरोप यावेळी कारमध्ये रोहन, इथन आणि जोशुवा हे तीन मित्र होते. कार दरीत कोसळली आणि त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला मडगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा... ‘चांदमियां पाटीलांच्या छातीत ‘राम’ नाही तर काळे कुट्ट विष ठासून भरलेय’ ॲक्सिस बँकेचा उलटा कारभार, शेतकऱ्याविरुद्ध काढलं कोलकाता कोर्टाचं वॉरंट
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Goa

    पुढील बातम्या