शिवसेनासारख्या 'थर्ड क्लास' पार्टीला गोव्यात स्थान नाही, भाजप नेत्याने डागली तोफ

शिवसेनासारख्या 'थर्ड क्लास' पार्टीला गोव्यात स्थान नाही, भाजप नेत्याने डागली तोफ

  • Share this:

पणजी,2 डिसेंबर: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेना सारख्या 'थर्ड क्लास' आणि तलवार काढणाऱ्या पार्टीला गोव्यात स्थान नाही. संजय राऊतांनी गोव्यातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये. गोव्यात शिवसेनेला आणि त्यांच्या फ्रंटला कोणतेच स्थान नाही. सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वरती आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही गोव्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, असं सांगत विश्वजित राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

आणखी काय म्हणाले विश्वजित राणे?

कदाचित महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यांत भूकंप होईल, गोव्यात मात्र अशा भूकंपाला स्थान नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपला सेक्युलर भाजप बनवला आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चनवर्ग भाजपबरोबर आहे. यापुढेही तो भाजपसोबतच राहील, असा दावा विश्वजित राणे यांनी केला आहे.

SPECIAL REPORT : शिवसेनेचं 'गोवा मिशन'

लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता शिवसेना 'गोवा मिशन'ला लागली आहे, असं म्हटलं तर; वावगं ठरणार नाही.

राज्याच्या राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान ठरलेले शिवसेने नेते संजय राऊत यांचं पुढचं लक्ष्य गोवा असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होणार की काय या चर्चेला सुरूवात झाली. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊतांनी देत एकच खळबळ उडवली. यावेळी राऊतांनी नेहमी प्रमाणे आपल्या खास शैलीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीकास्त्रही सोडलं.

गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत. भाजपला 27 आणि काँग्रेसला 5 जागा विधानसभेत आहेत. तर, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला 1, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एका जागा आहे. तर, 3 जागा अपक्षांच्या आहेत.

काँग्रेसचे 10 आमदार भाजपात सामील झाल्यानंतर भाजपचं पारडं जड झालं आणि भाजपकडे सत्तेच्या किल्ल्य़ा आल्या. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाले. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. आता मात्र, प्रमोद सावंत यांनाच शिवसेनेकडून आव्हान देण्यात येणार आहे.

गोवा पक्षीय बलाबल (एकूण जागा- 40)

भाजप - 27

काँग्रेस - 05

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी- 01

गोवा फॉरवर्ड पार्टी - 03

राष्ट्रवादी काँग्रेस - 01

अपक्ष - 03

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 09:17 PM IST

ताज्या बातम्या