मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Global Warming: मुंबईसह अनेक शहरं जाऊ शकतात समुद्राच्या पाण्याखाली

Global Warming: मुंबईसह अनेक शहरं जाऊ शकतात समुद्राच्या पाण्याखाली

जागतिक तापमानावाढीमुळे (Global warming) समुद्राची पाणीपातळी (Sea Level) वाढत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे मुंबईसह 50 शहर बुडण्याचा धोका आहे.

जागतिक तापमानावाढीमुळे (Global warming) समुद्राची पाणीपातळी (Sea Level) वाढत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे मुंबईसह 50 शहर बुडण्याचा धोका आहे.

जागतिक तापमानावाढीमुळे (Global warming) समुद्राची पाणीपातळी (Sea Level) वाढत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे मुंबईसह 50 शहर बुडण्याचा धोका आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: गेल्या काही वर्षांत वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचं (Environment impact climate change) अपरिमित नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर झाल्याचं दिसून येत आहे. वायू, तसंच जलप्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे (Pollution) अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषणात वाढ झाल्यानं जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) धोका वाढत असून, याचे अनेक दुष्परिणाम आतापासूनच दृष्टिपथात येऊ लागले आहेत. जागतिक तापमानावाढीमुळे समुद्राची पाणीपातळी (Sea Level) वाढत असल्याचं निष्पन्न झालं आहे. ही स्थिती कायम राहिली तर मुंबईसह (Mumbai) आशियातली 50 शहरं बुडतील आणि त्यात भारत, चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधल्या काही शहरांचादेखील समावेश असेल, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. याविषयीचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे.

हवामानाविषयी संशोधन करणाऱ्या Climatecentral.org या वेबसाइटनं नुकतंच एक संशोधन केलं आहे. जगातल्या हायटाइड (Hightide) क्षेत्रात येणाऱ्या देशांमध्ये समुद्राची पाणीपातळी वाढल्यानं 15 टक्के लोकसंख्या धोक्यात येऊ शकते. तसंच येत्या 200 ते 2000 वर्षांत जगाचा नकाशा (Map) लक्षणीयरीत्या बदलू शकतो, असं या संशोधनात म्हटलं आहे. समुद्राची पाणीपातळी वाढल्याने जगभरातल्या 184 भागांवर थेट परिणाम होऊ शकतो. भारतात मुंबईलादेखील अशा प्रकारचा धोका आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे तुमच्याही कानावर परिणाम होतोय का? अशी होते सुरुवात, वाचा सविस्तर

 अनेक शहरं समुद्राच्या पाण्याखाली जाण्यास जागतिक तापमानवाढ कारणीभूत ठरेल. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. सातत्यानं प्रदूषण वाढत असल्याने तापमानदेखील वाढत आहे. एका अहवालानुसार, 2100 सालापर्यंत तापमान 4.4 अंश सेल्सिअसने वाढू शकेल, असा अंदाज आहे. येत्या दोन दशकांत तापमानात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होईल. तापमान वाढल्याने हिमनद्या (Glacier) वितळू लागतील आणि त्याच्या पाण्यामुळे समुद्राची पाणीपातळी वाढेल. यामुळे किनारपट्टी भागात मोठं नुकसान होईल, असं सांगितलं जात आहे.

यापूर्वी `इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज`ने (IPCC) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आलं होतं, की 79 वर्षांत म्हणजेच 2100 मध्ये भारताच्या किनारपट्टी भागातली 12 शहरं सुमारे 3 फूट पाण्यात बुडतील. यात चेन्नई, कोची, भावनगर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. अमेरिकी अंतराळ संस्था असलेल्या नासाने (NASA) `आयपीसीसी`च्या या अहवालाच्या आधारे `सी लेव्हल प्रोजेक्शन टूल` तयार केलं आहे.

केरळमध्ये महापुराचा हाहाकार; एका सेकंदात कोसळलं भलमोठं घर, VIDEO VIRAL

चीन, भारत, बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया हे देश कोळशावर (Coal) आधारित प्रकल्प उभारणीत आघाडीवर आहेत. या देशांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक दुष्परिणाम या देशांवर होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या देशांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकालाही मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. इतकंच नाही, तर जागतिक तापमानवाढीमुळे बेट स्वरूपातले अनेक देश नष्ट होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

First published:

Tags: Environment, Pollution