Home /News /mumbai /

अखेर मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचं अन् वाघाच्या बछड्याचं बारसं झालं साजरं, दिली ही भन्नाट नावं

अखेर मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचं अन् वाघाच्या बछड्याचं बारसं झालं साजरं, दिली ही भन्नाट नावं

मुंबईच्या भायखळा (Bhaykhala) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) जन्म घेतलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचं आणि वाघाच्या बछड्याचं (baby penguin and tiger Calf) आज बारसं घालण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 जानेवारी: मुंबईच्या (Mumbai) भायखळा (Bhaykhala) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) जन्म घेतलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचं आणि वाघाच्या बछड्याचं (baby penguin and tiger Calf) आज बारसं घालण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor kishori pedanekar) यांच्या हस्ते केक कापून हे बारसं साजरं करण्यात आलं आहे. यावेळी पेडणेकर स्वत: प्राणीसंग्रहालयाच्या थ्रीडी ऑडिटोरियममध्ये उपस्थित होत्या. वाघाचा बछडा लहान असल्यामुळे पुढील काही काळ पर्यटकांना त्याला पाहता येणार नसल्याची माहिती प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 19 ऑगस्ट 2021 रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पेग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला होता. या पिल्लाचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलं आहे. तर औरंगाबाद येथील सिद्धार्ध प्राणी संग्रहालयातून राणीच्या बागेत आणलेल्या वाघाच्या जोडीला 14 नोव्हेंबर 2021 रोजी बछडा झाला आहे. या बछड्याचं नाव 'वीरा' ठेवण्यात आलं आहे. आज अखेर प्राणीसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियममध्ये उपस्थित राहून मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी केक कापून या नव्या पाहुण्याचं बारसं साजरं केलं आहे. हेही वाचा-OMG! पळता पळता अचानक हवेतच उडू लागलं हरिण; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत VIDEO दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून करिष्मा आणि शक्ती नावाची वाघाची जोडी राणीच्या बागेत आणण्यात आली होती. ही जोडी बंगाल टायगर जातीची आहे. 14 नोव्हेंबर 2021 या वाघाच्या जोडीने मादी बछड्याला जन्म दिला आहे. आज याचं नामकरण 'वीरा' करण्यात आलं आहे. वीरा अजून लहान असल्याने तूर्तास पर्यटकांना त्याला पाहता येणार नाही. हेही वाचा-श्वानावर जडलं पोपटाचं प्रेम; अनोख्या अंदाजात केलं प्रपोज, VIDEO जिंकेल तुमचं मन याशिवाय राणीच्या बागेतील पेग्विन कक्षात ऑगस्ट महिन्यात एका पिल्लाला जन्म दिला आहे. यामुळे आता राणीच्या बागेत पेग्विनची संख्या नऊ झाली आहे. यामध्ये चार मादी आणि पाच नरांचा समावेश आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने हे उद्यान बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आणखी काही दिवस पर्यटकांना याठिकाणी येता येणार नाही. वीरा आणि ऑस्करला पाहण्यासाठी पर्यटकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या