Home /News /mumbai /

गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे द्या, नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांकडे केली मागणी

गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे द्या, नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांकडे केली मागणी

' महिला सरकारी वकिलांना व्यावसायिक वैमनस्यातुन त्रास दिला जात असेल त्यांच्या पाठीमागे गृहविभागाने उभे राहणे आवश्यक आहे.'

    मुंबई 06 ऑक्टोबर: महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अशी बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. महिलांच्या संरक्षणासाठी नव्याने अंमलात येणारा दिशा कायदा आणि सध्या अस्तित्वात असलेले कायदे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देता येतील का याचाही विचार व्हावा अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीत केली. ज्या महिलांवर सातत्याने हल्ले होत आहेत त्यांच्या केसचा तपशील वा केस तपासून महिलांना शस्त्र देता येतील का? तशी पीडित महिलेने मागणी केल्यास व कायद्याने योग्य असेल तर यावर कार्यवाही करण्याबाबत गृह विभागास निर्देश द्यावेत अशी सूचना गोऱ्हे यांनी केली. या बैठकीत प्रामुख्याने दिशा कायदा अस्तित्वात येण्यासाठी चर्चा झाली. अशा प्रकारच्या कायद्यामुळे इतर राज्यामध्ये झालेला परिणाम, स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन, महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणे, त्यावरची कारवाई, न्यायालयातले खटले अशा अनेक पैलुंवर या बैठकीत चर्चा केली. दिशा कायद्याचा मसुदा सामाजिक संघटनांना देऊन त्यांचीही मते घेतली जावीत असं मतही त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाथरसमध्ये, पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदत महिलांसाठी पोलिसांनी नवीन हेल्पलाईन नंबर तयार केला पाहिजे. त्याच बरोबर महिला अत्याचारांच्या घटनांचा योग्य पद्धतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी आणखी प्रयत्न केली पाहिजे असं मतही गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. तसेच सायबर गुन्ह्या संदर्भात 66 अ कलम हे अजामीनपात्र करण्याबाबत देखील कायद्यात तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सोशल मीडियावर महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा, शब्द, प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केले पाहिजेत असे देखील गोऱ्हे यांनी सांगितलं. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले जिल्हे महाराष्ट्रात; आरोग्य सचिवांकडून इशारा गोऱ्हे पुढे म्हणाल्या, महिला सरकारी वकिलांना काही जिल्ह्यात इतर वकिलांकडून मानहानी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. पुणे येथील माजी जिल्हा सरकारी वकील यांनी त्यांना सरकारी वकील यांनी दिलेल्या त्रासाबद्दल आपल्याकडे तक्रार दिली आहे यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. महिला सरकारी वकिलांना व्यावसायिक वैमनस्यातुन त्रास दिला जात असेल त्यांच्या पाठीमागे गृहविभागाने उभे राहणे आवश्यक आहे. कारण त्या पोलीस आणि विधी व न्याय विभागासाठी काम करत असतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं. महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि निर्णय घेतले जातील असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Women safety

    पुढील बातम्या