S M L
Football World Cup 2018

'त्या' कुमारी मातेला पित्याच्या नावाविना जन्म दाखल द्या, कोर्टाचे पालिकेला निर्देश

कुमारी मातेला जन्म दाखल्यावर जन्मदात्या पित्याचं नाम देण्याची सक्ती का असा सवाल करत मुंबई हायकोर्टात एका महिलेनं याचिका दाखल केली होती

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 08:49 AM IST

'त्या' कुमारी मातेला पित्याच्या नावाविना जन्म दाखल द्या, कोर्टाचे पालिकेला निर्देश

14 मार्च : शण. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं 'त्या' कुमारी मातेला पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवून जन्म दाखला देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले आहे.

मुंबईतील एका २२ वर्षीय अविवाहीत महिलेनं मुलाच्या जन्मदाखल्यावरील पित्याचं नाव काढून टाकण्याची मागणी केली होती. तिच्या दाव्यानुसार तिनं चुकून सदर पुरूषाचं नाव जन्मदात्याचं नाव म्हणून दिलं होतं. मागील सुनावणीत यावर हायकोर्टानं स्पष्ट केलं होतं की, अश्याप्रकारे महिलेच्या मनाप्रमाणे पित्याचं काढता किंवा घालता येणार नाही. या प्रकरणी मंगळवारच्या सुनावणीत जन्मदाखल्यात नाव असलेल्या व्यक्तीला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सदर पुरूषानं हायकोर्टात उपस्थित राहून स्वत:चं नाव जन्मदाखल्यावरून काढून टाकण्यास हरकत नसल्याचं लेखी हमीपत्र सादर केलं.

त्या महिलेकडून पालिकेत जन्म दाखल्यासाठी दिलेल्या अर्जात जन्मदात्या पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या वतीनं ही विनंती नामंजूर करत त्या मुलीला जन्मदाखला देण्यास नकार कळवण्यात आला. याविरोधात महिलेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हा महत्त्वपूर्ण निकाल देताना हायकोर्टानं सुप्रीम कोर्टातील या संदर्भातील एका निकालाचा आधार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close