'त्या क्रेडिट कार्डची माहिती द्या', ईडीने प्रताप सरनाईकांना पुन्हा बोलावले चौकशीला!

'त्या क्रेडिट कार्डची माहिती द्या', ईडीने प्रताप सरनाईकांना पुन्हा बोलावले चौकशीला!

प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीला पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड आढलले होते.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने पुन्हा एकदा सरनाईक यांना समन्स बजावला आहे. 13 डिसेंबरपासून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीला पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड आढलले होते. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे. ईडीकडून फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहिण्यात आले आहे. तसंच पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागविण्यात आले आहे.  प्रताप सरनाईक यांना 13 तारखेपासून ते 21 डिसेंबरपर्यंत चौकशीला राहण्याचे आदेश दिले आहे.

प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. CNN NEWS18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेअरमाउंट, कॅलिफोर्निया  (Fairmont Bank, California) इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली होती. 'आता पुन्हा EDच्या चौकशीला यावं लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी मी तात्काळ दोन तासात हजर होईल. तसंच माझ्या कुटुंबीयांमधील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची आवश्यकता नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न-उत्तरे झाली. घोटाळा करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली होती.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या