मुंबई, 15 सप्टेंबर : 'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. जातीय सलोखा राखून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही आमची भूमिका कायम आहे अन्यथा संघर्ष अटळ आहे, अशी स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली.
ओबीसी ने प्रकाश शेंडगे, माजी खासदार हरीभाऊ राठोड, दशरथ पाटील, जे डी तांडेल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाची आरक्षणाबद्दल बाजू स्पष्ट केली.
'मराठा आरक्षण सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण ओबीसी आरक्षण धक्का लागू नये ही भूमिका कायम आहे. आता मराठा समजाला आरक्षण कशातून देणार, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही आमची भूमिका कायम आहे', असं शेंडगे यांनी सांगितले.
मोठी बातमी, पुण्यात कोरोना परिस्थितीत महापालिकेतून धक्कादायक माहिती समोर
'महाराष्ट्रात एससीबीसी दर्जा मराठा समाजात टाकण्याच काम केले जात आहे. ओबीसी समाज धक्का देण्याच काम सुरू आहे. मराठा आणि ओबीसी संघर्ष टाळायचे असेल तर लक्ष द्यावे हे सांगितले पण सरकारने लक्ष दिले नाही. काही मराठा समाजातील लोकं आता भटक्या समाजातील ओबीसी आरक्षण यावर टीका करू लागले हे चुकीच आहे. मराठा आरक्षण यावरून मराठा समाज नेते प्रशोभक भूमिका घेतात', असं मतही शेंडगे यांनी मांडले.
'मराठा आरक्षण हा विषय जातीय सलोख्याने हाताळला पाहिजे, सामाजिक वातावरण खराब होऊ नये', अशी विनंतीही शेंडगे यांनी केली.
'गरीब मराठा विद्यार्थी ईडब्लूएस अंतर्गत विचार करावा. ईडब्लूएस अंतर्गत आरक्षण गरीब विद्यार्थी लाभ द्यावा, मेगाभरती त्वरित सुरू करावी', अशी मागणीही शेंडगे यांनी केली.
'धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल अध्यादेश का निघत नाही? ओबीसी, धनगर समाज यासाठी योजना निधी नाही आणि मराठा समजाला पाठीशी का घातले जाते आहे. मराठा आरक्षणासाठी वकील फौज दिली मग धनगर समाज कोर्टात वकील फौज का दिली जात नाही', असा सवालही शेंडगे यांनी उपस्थिती केला.
25 सप्टेंबरपासून लागू होणार 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य
'ओबीसी समाज आरक्षण धक्का लागू नये अन्यथा संघर्ष अटळ आहे. मेगाभरती सुरू करावी, महाजोती 50 कोटी निधी द्यावा, ओबीसी महामंडळ मागणी पूर्ण करावी या काही मागणी आहे. जर 30 सप्टेंबरपर्यंत ओबीसी मागण्या पूर्ण केल्या नाही तर राज्यात आंदोलन केले जाईल', असा इशाराही शेंडगे यांनी दिला.