लोकांचा विश्वास तोडू नका, नाहीतर.., मनसे नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

'वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी मनसेच्या वतीने 26 नोव्हेंबरला राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे'

'वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी मनसेच्या वतीने 26 नोव्हेंबरला राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे'

  • Share this:
मुंबई, 22 नोव्हेंबर : लॉकडाउनच्या  (LockDown) काळात वाढीव वीज बिलाच्या (electricity bill) मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. मनसेनं सोमवारपर्यंत राज्य सरकारला  अल्टीमेटम दिला आहे. आता 26 नोव्हेंबर रोजी सुद्धा राज्यभरात मनसे मोर्चे काढणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (bala Nadgaonkar) यांनी दिली. तसंच, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही नांदगावकरांनी व्यक्त केली. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. 'वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी मनसेच्या वतीने 26 नोव्हेंबरला राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलनं केलेली आहेत, 26 तारखेचा मोर्चा शांततेत आणि फिजिकल डिस्टंसिंगचं पालन करून करण्यात येईल, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार? अजितदादांनी दिले स्पष्ट उत्तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहे.  पण त्यांनी आता शाब्दिक दिलासा देऊ नये, वीज बिलाबाबत ठोस निर्णय घ्यावा. कारण, लोकांचा विश्वास तोडू नका, नाहीतर ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं आहे. ते तुम्हाला पायदळी तुडवतील, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. 'कान असून बहिरं आणि डोळे असून आंधळं असं हे सरकार आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास सरकारने तोडू नये', असा टोलाही नांदगावकर यांनी लगावला. अल्टीमेटमचा इशारा देणारे बॅनर झळकले दरम्यान, सरकारला वीज बिल दरवाढ मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मनसेने आपला विरोध दर्शवत राज्य सरकारला सोमवार 23 नोव्हेंबर पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. आता राज्य सरकारने काहीच निर्णय जाहीर न केल्याने मनसेने सर्वत्र बॅनरबाजी केली आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील सोमवारच्या अल्टीमेटमची आठवण सरकारला करून देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या ‘एक्झॉटिक प्राणी’ योजनेवर सुप्रीम कोर्टाची मोहोर ठाण्यात वागळे इस्टेट इथं असलेल्या महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर मनसेकडून मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर वीज बिल दरवाढ मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ आहे, असे सांगण्यात आले आहे. 26 तारखेला मनसेतर्फे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाणार आहे. त्याआधी सरकारला मनसेकडून इशारा देण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published: