Home /News /mumbai /

छेडछाडीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने मारली लोकलबाहेर उडी

छेडछाडीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने मारली लोकलबाहेर उडी

भीतीनं मुलीनं चालत्या गाडीतून उडी मारल्याने मुलीच्या पायाला दुखापत आणि डोक्याला 20 टाके पडले आहेत. दरम्यान संबंधित आरोपी फरार झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.

मुंबई,23 ऑक्टोबर: मुंबईत काल छेडछाडीच्या भीतीने 14 वर्षाच्या मुलीनं धावत्या लोकलमधून उडी मारली. यामुळे मुलीच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. ही मुलगी सीएसटी कल्याण ट्रेनमधून प्रवास करत होती. मुलगी ट्रेनमध्ये चढल्यावर ट्रेन सुरू झाली. त्यानंतर थोड्याच वेळात एक अज्ञात व्यक्ती कोचमध्ये शिरला. आरोपी मुलीच्या दिशेने निघाला. त्यामुळे मुलगी घाबरली. तिने ट्रेनची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र चेन खेचता न आल्यानं तिने ट्रेनमधून उडी मारली. भीतीनं मुलीनं चालत्या गाडीतून उडी मारल्याने मुलीच्या पायाला दुखापत आणि डोक्याला 20 टाके पडले आहेत. दरम्यान संबंधित आरोपी फरार झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे मुंबईत महिल्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात एका मुलीला भर चौकात एका तरूणाने मारहाण केली होती. या मारहाणीत  ती मुलगी गंभीर जखमी झाली होती.
First published:

Tags: CST, Kalyan, Maharashtra, Molestation, अल्पवयीन, उडी

पुढील बातम्या