जुईनगरमध्ये धावत्या लोकलमधून चोरट्यानं तरुणीला बाहेर फेकलं

जुईनगरमध्ये धावत्या लोकलमधून चोरट्यानं तरुणीला बाहेर फेकलं

लोकलमधून फेकलेल्या जखमी तरुणीचं नाव ऋतुजा बोडके असं आहे. ऋतुजा ही एक 19 वर्षांची विद्यार्थीनी आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास सीवुड स्टेशनहून मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल ऋतुजाने पकडली. चोरटा तिच्या मागोमाग लेडिज डब्यात चढला. लोकलनं स्टेशन सोडल्यानंतर त्यानं तिच्याजवळची पर्स आणि मोबाईल हिसकावून घेतला.

  • Share this:

 जुईनगर,03 डिसेंबर: नवी मुंबईत चोरट्यानं धावत्या लोकलमधून तरुणीला फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

लोकलमधून फेकलेल्या  जखमी तरुणीचं नाव ऋतुजा बोडके असं  आहे. ऋतुजा ही एक 19 वर्षांची विद्यार्थीनी आहे.  काल रात्री साडेअकराच्या सुमारास सीवुड स्टेशनहून मुंबईच्या दिशेनं जाणारी  लोकल ऋतुजाने पकडली. चोरटा तिच्या मागोमाग लेडिज डब्यात चढला.

लोकलनं स्टेशन सोडल्यानंतर त्यानं तिच्याजवळची पर्स आणि मोबाईल हिसकावून घेतला. तिच्या कानातल्या रिंग्स ओढण्याचा ज्यावेळी त्यानं प्रयत्न केला त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत त्यानं तिला लोकलबाहेर फेकून दिलं. ही घटना घडत असताना जुईनगर स्टेशन जवळ आलं होतं. त्यामुळं लोकलचा वेग कमी होती. सुदैवानं ऋतुजा यातून बचावली आहे.

तिच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला वाशीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हल्लेखोर चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

First published: December 3, 2017, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading