Home /News /mumbai /

पोटाची खळगी भरण्यासाठी मुलीनं घेतला मुलाचा वेष; पुण्याच्या मुलीचा मुंबईत 8 महिने संघर्ष

पोटाची खळगी भरण्यासाठी मुलीनं घेतला मुलाचा वेष; पुण्याच्या मुलीचा मुंबईत 8 महिने संघर्ष

Mumbai news: घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं कामानिमित्त मुंबईत गेलेली मुलगी तब्बल आठ महिने मुलगा बनून वावरत असल्याची माहिती समोर आली आहे.

    भिवंडी, 04 जुलै: घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं पुण्यातील एका मुलीनं घरात कोणालाही न सांगता कामासाठी मुंबईत आली होती. पण या ठिकाणी आल्यानंतर तिच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिनं चक्क मुलगा बनवण्याचा निर्णय घेतला. मुलाप्रमाणे केस बारीक करून मुलांचे कपडे घालून तिनं मुंबईत तब्बल आठ महिने संघर्ष केला. कामासाठी दारोदारी भटकली, पण लॉकडाऊनमुळे तिला कुठेही काम मिळालं नाही. त्यामुळे तिनं भिंवडीत वेगवेगळ्या इमारतीच्या आडोशाला रात्र काढत संघर्ष करत होती. मिळेल ती छोटी-मोठी कामं करत ती आपला उदरनिर्वाह करत होती. पण भिवंडीतील शांतीनगर परिसरात पोलीस गस्त घालत असताना संबंधित मुलीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी तिला मुलगा समजून ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणलं. पण चौकशीसाठी आपण एका मुलाला ताब्यात घेतलं नाही, तर मुलीला ताब्यात घेतल्याचं कळाल्यानंतर पोलीसही हैराण झाले. यानंतर संबंधित मुलीनं आपल्या संघर्षाची कहाणी पोलिसांना सांगितली. तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी आपण मुलाचा वेष घेतला असल्याचंही तिनं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी दोन दिवस संबंधित मुलीची माहिती काढत तिच्या घरचा पत्ता शोधला. तेव्हा संबंधित मुलीची ओळख खरी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मुलीचं नाव छाया दशरथ माने (वय-21) असून ती पुण्यातील हडपसर परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. मागील आठ महिन्यांपासून ही मुलगी भिवंडी परिसरात समीर शेख नावानं वावरत होती. दरम्यानच्या काळात ती मुलगी असल्याचं कोणाच्याही निदर्शनास आलं नाही. हेही वाचा-पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी; ठाण्यातील थरारक घटना दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. तसेच त्यांना भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात बोलावून मुलीला त्यांच्या स्वाधीन केलं आहे. आठ महिन्यापूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आई वडिलांनी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात नोंदवली असल्याचंही निष्पन्न झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Pune

    पुढील बातम्या