S M L

कळंबोलीत कुमारी मातेसह अर्भकाचा मृत्यू

महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली ही 16 वर्षाची मुलगी सेक्टर 12 मध्ये राहत होती.तिचा प्रियकरही महाविद्यालयीन विद्यार्थी होता.ही मुलगी गर्भवती होती.

Sonali Deshpande | Updated On: Feb 12, 2018 12:45 PM IST

कळंबोलीत कुमारी मातेसह अर्भकाचा मृत्यू

नवी मुंबई, 12 फेब्रुवारी : नवी मुंबई इथल्या कळंबोली सेक्टर 12 मधील त्रिवेणी सोसायटीमध्ये कुमारी मातेचा अर्भकासह मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय.कुमारी मातेच्या कुटुंबीयांनी घरातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतल्याने ही घटना घडल्याचं बोललं जातंय.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली ही 16 वर्षाची मुलगी सेक्टर 12 मध्ये राहत होती.तिचा प्रियकरही महाविद्यालयीन विद्यार्थी होता.ही मुलगी गर्भवती होती.काल तिला प्रसूती कळा सुरू झाल्याने घरातच तिची प्रसूती करण्यात आली.मात्र यादरम्यान अर्भकाच्या मृत्यू झाला.काही वेळाने मुलीला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं.मात्र तोपर्यंत तिचाही मृत्यू झाला.या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत प्रसूती दरम्यान निष्काळजीपणा केल्याबद्दलही गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close