• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • घाटकोपर इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 17 वर

घाटकोपर इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 17 वर

घाटकोपरमधल्या सिद्धी साई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी जिवंत व्यक्ती अडकलंय का हे शोधण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जातेय.

  • Share this:
मुंबई, 25 जुलै : घाटकोपरमधल्या  सिद्धी साई  इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 17 वर गेलीय. तर 16 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जातेय. जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्यानं अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान बचावकार्यात सहभागी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीये. साई दर्शन इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेत. घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ ही सिद्धी साई अपार्टमेंटची इमारत होती. मंगळवारी  सकाळी साडेदहाच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. सुमारे 40 वर्षांपूर्वीची ही इमारत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचं नुतनीकरण सुरू होतं. अशातच ही अख्खी इमारत कोसळलीय. या इमारतीत 12 कुटुंबं राहत होती. सहा महिन्यापूर्वीच मनपाने या इमारतीला धोकादायक असल्याची नोटीसही पाठवली होती. साईदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे वर्षा सकपाळ, २० वर्ष गिता रामचंदानी, ५८ वर्ष रंजनबेन शहा, ६२ वर्ष सुलक्षणा खानचंदानी, ८० वर्ष विठ्ठल शिरगिरी, ३५ वर्षे मनसुखभाई गजर, ७५ वर्षे व्ही. रेणुका ललित, ३ वर्षे
First published: