मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्या करणारा युवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे. तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने हे कृत्य केले.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 07:44 PM IST

मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रणाली कापसे, मुंबई 24 जून :  मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या दलनाबाहेर एका व्यक्तीने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. तो व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून आपल्या कामांचा पाठपुरावा करत होता, परंतु त्याचे काम न करता अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याने त्यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढं आलीय.

सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव आहे, घाटकोपर भटवाडी येथे राहणार आहे, घटकोपर पश्चिम मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे येथील जुने शौचालय तोडण्यास विरोध असतानाही महापालिकेने तोडण्याची प्रक्रिया राबवून त्याचा वापर बंद केला होता. त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. याबद्दल त्याने तक्रारी केल्या होत्या मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती.

त्यामुळे त्याने आत्महत्येचा इशाराही दिला होता.  त्यांनी स्वतःच्या नावावर पास न बनवता दुसऱ्याच्या नावावर पास बनवून महापालिकेच्या इमारतीत प्रवेश केला. तो येणार असल्याने सुरक्षा यंत्रणा कडक केली होती, परंतु त्यांना गुंगारा देऊन आता प्रवेश केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या बाटलीत त्याने रॉकेल आणलं होतं. त्यांना त्यानंतर जवानांनी तात्काळ  ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिसांच्या स्वाधीन केलं.

BSNL तोट्यात, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत

देशातली सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली BSNL सध्या आर्थिक संकटातून जातेय. BSNLमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही कंपनीकडे पैसे नाहीत. जून महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न कंपनीच्या व्यवस्थापनाला पडला असून कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची याचना केलीय.

खासगी कंपन्यांच्या आकर्षक जाहीराती, उत्तम सुविधा आणि वेगवान इंटरनेट यामुळे लोक झपाट्याने BSNL सोडून इतर कंपन्यांकडे वळत आहेत. त्यामुळे BSNLवर मोठं संकट ओढावलं आहे. प्रचंड मनुष्यबळ, गैरव्यवस्थापन आणि प्रचंड खर्च यामुळे कंपनीची परिस्थिती खालावली आहे. कंपनीला 13 हजार कोटींच देणं आहे. तर 2018 पर्यंत कंपनीला 90 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न कंपनीला पडलाय.

BSNLला दरमहिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला 850 कोटी लागतात. त्यामुळे जून महिन्याचे पगार करायला कंपनीकडे पैसेच नाहीत. कंपनीला जो महसूल मिळतो त्यातले 55 टक्के रक्कम ही फक्त पगारांवर खर्च होते. त्यात दरवर्षी  वेतनाचा खर्च 8 टक्क्यांनी वाढतोय त्यामुळे BSNL सरकारसाठी पांढरा हत्ती ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: suicide
First Published: Jun 24, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close