Home /News /mumbai /

कोण आहे सचिन वझे? महाराष्ट्र पोलिस सेवेत तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा झाला रुजू

कोण आहे सचिन वझे? महाराष्ट्र पोलिस सेवेत तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा झाला रुजू

घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट (Ghatkopar Blast) प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा यूनुसची (Khawaja Yunus) पोलिस कस्टडीत कथित हत्या झाली होती.

    मुंबई, 8 जून: मुंबईतील (Mumbai) घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट (Ghatkopar Blast) प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा यूनुसची (Khawaja Yunus) पोलिस कस्टडीत कथित हत्या झाली होती. ही घटना 16 वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तीन कॉस्टेबलला निलंबित करण्यात आलं होता. आता त्या चौघांना मुंबई पोलिस (Mumbai Police) सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आलं आहे. याबाबत एका पोलिस अधिकारीने माहिती दिली आहे. हेही वाचा.. महाराष्ट्र घेणार ऐतिहासिक निर्णय, परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत चर्चा सुरू सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वझे (Sachin Vaze),कॉस्टेबल राजेंद्र तिवारी (Rajendra Tiwari), सुनील देसाई (Sunil Desai) आणि राजाराम निकम (Rajaram Nikam) या चौघांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. या सगळ्यांवर ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे मिटवण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता तब्बल 16 वर्षांनी या चौघांना पोलिस सेवेत रुजू करून घेण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं दिली आहे. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपपत्र सचिन वझे हा 1990 बॅचा पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहे. त्याला 2004 मध्ये अटक करण्यात आलं होतं. त्याच्याविरुद्ध ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. सचिन वझे यांनी नोव्हेंबर 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु, त्याच्याविरुद्ध हत्येचा खटला सुरू असल्यामुळे त्याचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. तर मराठवाड्यातील परभणी येथील राहणार 27 वर्षीय ख्वाजा यूनुस हा इंजीनिअर होता. तो दुबईत नोकरी करत होता. डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये दररोज केवळ डाळ-भात देत होता रेस्टॉरंटचा मॅनेजर, वेटरनं केली हत्या ख्वाजा यूनुस याला चौकशीसाठी औरंगाबादला आणण्यात येत असताना तो फरार झाला होता, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, पोलिस कस्टडीत असतानाच ख्वाजा यूनुसची हत्या करण्यात आल्याचं सीआयडी चौकशीत समोर आलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई हायकोर्टाने (Bombay Highcourt) आदेश दिले होते. सीआयडीने या प्रकरणी 14 पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र, त्यापैकी सचिन वझेसह तिवारी, निकम आणि देसाई या तीन कॉन्स्टेबलविरुद्ध खटला चालवण्यास सरकारने परवानगी दिली होती. बचाव पक्षानं दावा केला होता. यूनुसला पोलिस कस्टडीमध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. लॉकअपमध्ये त्याचे कपडे उतरवून त्याला बेल्टने छाती आणि पोटावर जबर मारहाण करण्यात आली होती. 16 वर्षे सचिन वझे काय करत होता? 'इंडियन एक्स्प्रेस'ला एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2004 मध्ये ख्वाजा यूनुस हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सचिन वझे या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्याने स्वत: 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा स्विकरण्यात आला नाही. नंतर सचिन वझे याने 2008 नंतर शिवसेनेत सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम केलं. पु्स्तक लिहिलं.. सचिन वझे याने निलंबनाच्या काळात शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेव्हिड हेडली प्रकरणावर एक पुस्तक लिहिले. सॉफ्टवेअर डेव्हलपरही आहे वझे! एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, सचिन वझे याने सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ठाण्यातून आपल्या करियरला सुरूवात केली होती. नंतर तो पोलिस दलात रुचू झाला. सुरेश मांचेकर या टोळीवर वचक बसवण्यात सचिन वझे यांची प्रमुख भूमिका होती. नंतर क्राइम ब्रॅंचमध्ये तो सीआययूसोबत तैनात होता. तिथे त्यानं 'एन्काऊंटर स्पेशलिस्ट' प्रदीप शर्मा यांच्यासोबतही काम केलं.  टेक्नॉलॉजीवर चांगली पकड असल्याने सन 2010 मध्ये त्यानं लाल बिहारी नावानं एक नेटवर्किंग साइट सुरू केली होती.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या