स्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

स्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

ही मुलगी युट्यूबवर 'अस्टल ट्रॅव्हल'चे व्हिडिओ पाहत होती

  • Share this:

विवेक गुप्ता, प्रतिनिधी

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईमध्येही दिल्लीतील बुराडी हत्याकांडप्रमाणे एक घटना घडली आहे. भोईवाडा भागात 14 वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आत्मा शरीरात पुन्हा येईल, या आशेनं या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी युट्यूबवर 'अस्टल ट्रॅव्हल'चे व्हिडिओ पाहत होती. या व्हिडिओमध्ये दावा केला जात होता की, शरीरातून आत्मा बाहेर निघून जातो आणि स्वर्ग भ्रमण करून पुन्हा शरीरात येऊ शकतो.

10 जानेवारीला या मुलीनं घरी श्वास कोंडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला तिच्या आजीनं रोखलं होतं. त्यानंतर तिने पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने बाथरुममध्ये जाऊन 'स्वर्गातून परत येऊ', या भरोशानं गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ती बाथरुममधून लवकर बाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी लगेच दरवाजा तोडून तिला बाहेर काढलं आणि केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु,13 जानेवारी रविवारी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.

मागील वर्षी जुलै महिन्यात दिल्लीत बुराडी भागात भाटिया कुटुंबातल्या 11 जणांनी आत्महत्या केली होती. 'देवाला भेटायला जायचं आहे' अशी नोंद घटनेच्या चार दिवस आधीच डायरीत करण्यात आल्याचं आढळून आलं होतं.

====================

First published: January 15, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading