वीज चोरांवर मोक्का लावा-बेस्ट

आजवर मोक्का हा अतिरेकी कारवाया करणाऱ्यांवर लावला गेला आहे, पण वीज चोरी प्रकरणात अशी मागणी बेस्टनं तरी पहिल्यांदाच केली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 10:12 AM IST

वीज चोरांवर मोक्का लावा-बेस्ट

मुंबई, 10 ऑक्टोबर: वीज चोरी करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी मुंबईत बेस्टनं केली आहे. असं झालं तर वीज चोरी प्रकरणात एखाद्या व्यक्तीवर मोक्का लावला जाण्याची ही पहिलीचं वेळ असेल. आजवर मोक्का हा अतिरेकी कारवाया करणाऱ्यांवर लावला गेला आहे, पण वीज चोरी प्रकरणात अशी मागणी बेस्टनं तरी पहिल्यांदाच केली आहे.

बेस्टनं वीज चोरी प्रकरणार डेव्हीड अॅन्थनी नावाच्या इसमावर मोक्का लावला जावा अशी मागणी केलीय. धारावी परिसरात डेव्हीड हा वीज माफिया म्हणून ओळखला जातो. बेस्टच्या धाड पथकानं ४ ऑक्टोबरला कारवाई करत डेव्हीडला रंगेहात पकडलं होतं. डेव्हीड स्वतःच्या घरात तर चोरीची वीज वापरत होताच शिवाय धारावीत अनेक घरांमध्ये त्यानं चोरीचं कनेक्शन दिलं होतं. गेली कित्येक वर्ष तो हे काम करत होता. इतकच नाही तर वीज चोरी करण्यासाठी त्यानं माणसं सुद्धा ठेवली होती. त्यामुळे वीज चोरी करताना तो संघटना तयार करुन हे काम करत होता. म्हणून डेव्हीडवर मोक्का लावा अशी मागणी बेस्टच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याने केली आहे. डेव्हीडसह ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ७ ऑक्टोबरला एन्टॉप हील परिसरातसुद्धा धाड टाकून २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...