08 मे : मुंबईमध्ये अतिसाराची अर्थात गॅस्ट्रोची साथ पसरलीय, तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात तब्बल 5 हजार 401 किलो भेसळयुक्त बर्फ सापडलाय. मुंबईमधील कुर्ला, गोवंडी, घाटकोपर, देवनार, वांद्रे, मालाड, दहिसर या परिसरांमध्ये अतिसाराची अर्थात गॅस्ट्रोची साथ पसरलीये.
जानेवारीपासून आतापर्यंत २ हजार २८० जणांना अतिसाराची बाधा झाली आहे. दूषित पाणी आणि बर्फामुळे अतिसाराच्या साथीचा प्रादुर्भाव होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. रस्त्यावर विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.दूषित पाणी आणि बर्फामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिसाराच्या साथीने डोकं वर काढलं आहे.
दुषित पाण्यामुळे अतिसाराचा धोका संभवतो
लक्षणं
पोट दुखणं आणि वारंवार पातळ संडास होणं
उलटी होणे. लहान मुलांची टाळू खोल जाणं, डोळे खोल जाणं
तोंड कोरडे पडणे वजनात घट
लघवी कमी होणं किंवा लघवीचा रंग बदलणं
उपाय
पाणी उकळून आणि गाळून पिणं
घराच्या परिसरातील स्वच्छता राखणं
शौचाला जावून आल्यानंतर हात साबणाने धुणं
जलसंजीवनी देणं. याने फरक न पडल्यास दवाखान्यात दाखवावं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा